You are currently viewing बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध !

बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध !

बांधकाम कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कटिबद्ध !

बागायत येथे सक्सेस बांधकाम कामगार संघटना स्थापन करणार! १२०० कामगारांची आतापर्यंत झालीय नोंदणी

मालवण

राज्याकडून मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या सोई-सुविधा बांधकाम कामगारांना योग्यप्रकारे मिळण्यासाठी व बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी बागायत दशक्रोशीतील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांची सक्सेस बांधकाम कामगार संघटना लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. या संघटनेद्वारे बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संघटना कटिबद्ध राहील, असे आश्वासन बागायत येथील सक्सेस कॉम्प्युटरचे संचालक समीर पेडणेकर यांनी दिले.
बागायत दशक्रोशीतील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची महत्वाची बैठक बागायत येथील सक्सेस कॉम्प्युटरच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी घेण्यात आली. यावेळी बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी स्वाक्षरी देत नसल्याने बांधकाम कामगारांची शिष्यवृत्ती व नूतनीकरणासाठी मोठी गैरसोय होत आहे. काही कामगारांचे प्रस्ताव वेळीच कार्यालयात पोहोचत नसल्याने त्यांना शासनाच्या विविध सवलतींपासून वंचित राहवे लागत असल्याने याबाबत उपस्थित बांधकाम कामगारांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही गावात ग्रामसेवक घरपट्टी वसुलीच्या नावाखाली प्रस्तावावर स्वाक्षरी करत नसून कामगारांना वेठीस धरत असल्याचा आरोप बांधकाम कामगारांनी केला.

बांधकाम कामगार संघटनेतर्फे काही निधी संकलन करून संघटनेतील बांधकाम सभासदांवर आपत्ती आल्यास या निधीतून त्याला तातडीने मदत करण्याचे सर्वानुमते ठरले. सक्सेस कॉम्प्युटर बागायत कार्यालयातून आतापर्यंत १२०० बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून सोमवारी झालेल्या या बैठकीसाठी वेरळ, माळगाव, वडाचापाट, बिळवस, महान, आंगणेवाडी, रामगड, डिकवल, चौके, वायरी, ‘कोळंब, रेवंडी, पोईप, विरण, मालोंड, बेलाचीवाडी, राठिवडे, मसदे परिसरातील २०० बांधकाम कामगार उपस्थित होते.

समीर पेडणेकर, रमेश मासये, कृष्णा राणे, संतोश पालव, योगेश नाईक, धाकू मेस्त्री, सुधीर परब, तुकाराम माळकर, शंकर आंगणे, वैष्णवी राणे, संगीता दळवी, शांताराम परब, दशरथ नार्वेकर, कैलाश कांबळी, भक्ती परब स्वप्नील घाडीगावकर दत्ताराम मसुरकर
आदींनी बांधकाम कामगारांच्या योजनांबाबत कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर पेडणेकर, रुतिका तोंडवळकर, शंकर आंगणे आदींनी सहकार्य केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा