You are currently viewing तळवणेत १२ फेब्रुवारीपासून भंडारा उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

तळवणेत १२ फेब्रुवारीपासून भंडारा उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

तळवणेत १२ फेब्रुवारीपासून भंडारा उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम

सावंतवाडी

राजाधिराज योगिराज श्री महंत सद्गगुरु परशुराम भारती महाराज संजिवन समाधी मठ, तळवणे येथे भंडारा उत्सवानिमित्त १२ ते १७ फेब्रुवारी पर्यंत या कालावधीत नवनाथार्चन पूर्वक विष्णुयाग तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार १२ रोजी सकाळी ८ वाजता गणपती पूजन,देवतावंदन,पुण्याहवाचन,आचार्यवरण,स्थलप्राकारशुद्धी,समाधीपुरषावर लघुरुद्र दुपारी १२ वाजता ग्रामदेवतांचे मंदिरात आगमन,दुपारी १ वाजता नैवेद्य,आरती,तीर्थप्रसाद दुपारी २ वाजता महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता नामावंत कलाकार यांची संगीत भक्तिगीत गजल मैफिल ‘भारतीगाथा ‘ रात्री ९ वाजता पालखी सोहळा,रात्री १० वाजता पावणी लिलाव रात्री ११ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग गुरुवार १३ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ,दुपारी १ वाजता नैवेद्य आरती,तीर्थप्रसाद,दुपारी १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता स्थानिकांची भजने,रात्री १० वाजता श्री सतीदेवी मित्रमंडळ तळवणे वेळवेवाडी पुरस्कृत श्री सतीदेवी नाट्यमंडळ वेळवेवाडी आणि खिराईवाडी तुफान विनोदी नाटक ‘ सोरगत ‘ शुक्रवार १४ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ,दुपारी १ वाजता नैवेद्य,आरती,तीर्थप्रसाद,दुपारी १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता ह.भ.प.भाऊ नाईक,वेतोरे यांचे किर्तन,रात्री १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग शनिवार १५ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ,दुपारी १ वाजता नैवेद्य,आरती,तीर्थप्रसाद,दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता राशीनुसार तुमचा स्वभाव ( ज्योतिष्याचार्य डॅा.सौ.स्मिता गिरी ) रात्री १० वाजता वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ,तेंडोली यांचा ‘ अयोध्याधिश श्रीराम रविवार १६ रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधीस प्रारंभ व गणेश याग,दुपारी १ वाजता आरती,देवता प्रार्थना,आशिर्वाद ग्रहण,तीर्थप्रसाद,दुपारी १.३० ते ४ पर्यंत महाप्रसाद,सायंकाळी ७ वाजता श्री गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळ,फणसखोल ( बुवा- सिद्धेश गावडे ) याचा ‘ गजर हरिनामाचा ‘ रात्री ९.३० वाजता गुरुकृपा नाट्यमंडळ,तळवणे मठवाडी यांचे धमाल विनोदी नाटक ‘ पांडगो इलो रे इलो ‘ सोमवार १७ रोजी सकाळी ८ वाजता महापुरुष व गणपती यांची नित्यपूजा व अभिषेक,दुपारी १२ वाजता आरती नैवेद्य,दुपारी ४ वाजता गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा