You are currently viewing अंतोन फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ उद्या दांडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

अंतोन फर्नांडिस यांच्या स्मरणार्थ उद्या दांडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

मालवण

मालवण मधील रक्तदान चळवळी मधील एक अग्रणी कार्यकर्ते ग्लोबल रक्तकर्ण स्व. अंतोन उर्फ आतू फर्नाडिस यांच्या स्मरणार्थ ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि आतु फर्नांडिस मित्रमंडळ यांच्यावतीने आतु फर्नांडिस यांच्या हिरवी बत्ती, दांडी मालवण येथील निवासस्थानी उद्या ३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी श्री गणेश येशू मंदिर गवंडीवाडा, सिबर्ड दांडी ग्रुप, १०० इडियट्स ग्रुप यांचे सहकार्य लाभले आहे. या शिबिरात मोफत रक्तगट तपासणीही करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी राजू बिडये ९४२०२६१३३२, राजा शंकरदास ९४२२६३३३२५, सुरज भोसले ९४२००५०७५६, फ्रान्सिस फर्नांडिस ९०९६२१३२८७, अमेय देसाई ९४०४५३५२७३, राधा केरकर ९०२११६३५८०, हरी खोबरेकर ९४०४१६६२०९, विकास पांचाळ ८७९३३४६९८३, सिझर डिसोझा ९४०५४९७५४६, दीपक कदम ७७०९१९११८९, संदीप पेडणेकर ९४२३३०४३७२, विजय पांचाळ ८०८२४६१२६३, बबन वाघ ९४२३९२२०२३, नेहा कोळंबकर ९४०४९२०३६५६ यांच्याशी संपर्क साधावा. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे, तसेच इच्छुकांनी आपली रक्तगट तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा