You are currently viewing ८ फेब्रुवारीला माणगावात जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद

८ फेब्रुवारीला माणगावात जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद

कुडाळ :

छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण आणि जीर्णोद्धार केला. मात्र आज मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांच्या जमिनींवर अतिक्रमण, तसेच वक्फ बोर्डाद्वारे हिंदू मंदिरांच्या भूमी बळकावल्या जात आहेत. त्यामुळे मंदिर संस्कृती आणि श्रद्धेवर परिणाम होत आहे. मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन आवश्यक आहे. याच उद्देशाने हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे द्वितीय सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.कुडाळ येथील हाॅटेल स्पाईस कोकण येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री दत्त मंदिर न्यास (माणगाव)चे अध्यक्ष सुभाष भिसे, सचिव दिपक साधले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक यशवंत परब, प.पू. अण्णा राऊळ महाराज सेवा ट्रस्ट (पिंगुळी)चे विश्वस्त सुरेश बिर्जे, सनातनचे संत सदगुरू सत्यवान कदम, हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा