*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*काही शिकावे…..*
गुणी किती हो जगी लोक ते ज्ञानसागर महान हा
किती खोल हो जरी पोहला कोरडाच राहतो पहा
आयु जाते निघून सारी ज्ञानकण करता गोळा
हाती लागते फारच थोडे बनतो माणूस खुळखुळा…
पंख आपुले बळ आपुले आपले आपण जोखावे
उगा कशाला तीर कुणावर कारण नसता फेकावे
निकोप स्पर्धा मनी असावी शिकवण मिळते
शिकावे
जळून होतो आपला कोळसा राख होऊन का नासावे…..?
मी ज्ञानी मी विचारवंत कवी नि लेखक कुणी असा
बिरूदे लावू नये स्वत:ला चालू ठेवावा आपला वसा…
थेंबे थेंबे तळे साचते भरत रहावी आपली कुडी
हळू हळू मग जाते पहा हो उंच उंच आपुली गुढी…
किती कष्टता किती पोहता रोज वाचता किती तुम्ही
देती पुस्तके ज्ञानाची हो ठामच देती तुम्हा हमी
ज्ञानी असतो जमिनीवरी अर्धवट तो उडतो वरी
किती आहे हो पाणी खोल ते क्षणात ओळख पटे
खरी…..
प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
(९७६३६०५६४२)