You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये ११ फेब्रुवारी रोजी तुकाराम जाधव यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये ११ फेब्रुवारी रोजी तुकाराम जाधव यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये ११ फेब्रुवारी रोजी तुकाराम जाधव यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

वैभववाडी

येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी करिअर कट्टा विभाग आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग व साद फौंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व श्री.तुकाराम जाधव, संचालक द युनिक अकॅडमी पुणे यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच या कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन यश संपादन केलेल्या यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये कोकणातील विद्यार्थी मागे न राहता सर्वांसोबत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्येही अग्रेसर राहावा, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत स्पर्धा परीक्षा, उद्योजकता विकास व कौशल्य विकास यावर भर दिला जातो. करिअर कट्टा विभागामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि.११ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे पदाधिकारी तसेच स्थानिक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच युनिक अकॅडमीच्या यशवंत विद्यार्थिनी व प्रशासकीय अधिकारी कुडाळ गीतांजली नाईक आणि युनिक अकॅडमी सिंधुदुर्गचे मार्गदर्शक श्री. सचिन कोर्लेकर उपस्थित राहणार आहेत.या व्याख्यानाचा वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अजित दिघे 8087555465/ 9689414974 यांच्याशी संपर्क साधावा.

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

*📢 महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी*

*BCA डिग्री कोर्स 2025-26 प्रवेश प्रक्रिया सूचना*

*_महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी हे 1999 पासून सातत्याने महिलांसाठी कार्यरत असलेले रत्नागिरीमधील पहिले BCA महाविद्यालय आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे हे महाविद्यालय महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी समर्पित आहे._*

*महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये:*

✅ सुसज्ज ग्रंथालय व अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा.
✅ वसतिगृह, वाय-फाय सुविधा व CCTV निगराणी.
✅ महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन.
✅ महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर.
✅ प्लेसमेंटसाठी विशेष मार्गदर्शन आणि ट्रेनिंग प्रोग्राम.
✅ CET फॉर्म अचूकपणे भरता यावा यासाठी महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध आहे.
✅ महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा महिलांसाठी आदर्श उपक्रम.

📌 CET परीक्षा बंधनकारक असून, परीक्षेच्या महत्त्वपूर्ण तारखा खालीलप्रमाणे आहेत:
CET नोंदणीची अंतिम तारीख: 10 फेब्रुवारी 2025

*CET परीक्षा दिनांक:*

*▪️मंगळवार, 29 एप्रिल 2025*
*▪️बुधवार, 30 एप्रिल 2025*
*▪️शुक्रवार, 02 मे 2025*

*📔 CET साठी महाविद्यालयात मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातील.*

*🖥️ BCA प्रवेश व CET मार्गदर्शनासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा:*
*👉 WhatsApp Group Link*

*अधिक माहितीसाठी संपर्क:*

*📞 7972997567 / 9420274119*

https://chat.whatsapp.com/C9NyNYZkFefIVFORgLqceT

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी”*

*जाहिरात
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा