You are currently viewing पर्यटकाला मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे पोलीस निरीक्षक कुडाळ यांना निवेदन सादर

पर्यटकाला मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे पोलीस निरीक्षक कुडाळ यांना निवेदन सादर

पर्यटकाला मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे पोलीस निरीक्षक कुडाळ यांना निवेदन सादर

कुडाळ

झाराप झिरो पॉईंट येथे ग्राहकाला मारहाण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई व्हावी
शुल्लक कारणावरून पुणे येथील पर्यटकांना झाराप झिरो पॉईंट येथील हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे पोलीस निरीक्षक कुडाळ यांना आज निवेदन सादर करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती जिल्ह्याची बदनामी आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने बघावे.

मारहाण करणारे सर्व व्यक्ती या मुस्लिम समाजातील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत धार्मिक सलोखा अबाधित राहिला आहे. परंतु अशा व्यक्तीमुळे पुढे जाऊन धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो याची शक्यता आहे.
त्यामुळे अशा मुजोर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. असे कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा म्हणून संबंधित स्टॉल/हॉटेल बंद करण्यात यावे.
जर संबंधित लोकांवर कारवाई झाली नाही व पुन्हा अशी घटना घडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही याची नोंद घ्यावी.
पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेसंदर्भात योग्य ती कडक कारवाई केली जावी ‌ अशा आशयाचे निवेदन सकल हिंदू समाजातर्फे पोलीस निरीक्षक कुडाळ यांना देण्यात आले.

यावेळी विवेक पंडित, शेखर नाडकर्णी, रमा नाईक धीरज परब, समीर सराफदार, शिवप्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष ‌ मंगेश पाटील, दिनेश सावंत,
सुधीर राऊळ, प्रसन्ना गंगावणे, बाळा पावसकर रत्नाकर जोशी, चंदन कांबळी ‌ शुभम देसाई, अरविंद करलकर. अमित सरनोबत ‌ उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा