झाराप येथे १० फेब्रुवारीला “विश्वकर्मा प्रकटदिन” कार्यक्रम
वेंगुर्ले
सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यातीने १० फेब्रुवारी रोजी झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन कार्यक्रम आयोजित केला आहे.
यानिमित्त सकाळी ८ वा. ध्वजारोहण, १० ते १ इमारत बांधकाम कामगार नोंदणी, ११ ते १२ आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२ ते १ मान्यवरांचे स्वागत आणि समाज प्रबोधन, सुतार समाजातील पोलीस पाटील व अंगणवाडी ताईंचा सत्कार, १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ६ सिधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स, भजन, गायन व फुगडी, सायं. ६ ते ९ वा. ह.भ.प.गणपत महाराज पांचाळ यचे वारकरी कीर्तन, रात्रौ ९ वा. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ बाव यांचा नाट्यप्रयोग तर दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम. तसेच १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंतच उपस्थित असलेल्या महिला व पुरूषांसाठी लकी ड्राॅ होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष शरद मेस्त्री यांनी मंडळातर्फे केले आहे. दरम्यान, मंडळातर्फे भविष्यात सामुदायिक मौजीबंधन उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी शैलेश मेस्त्री (७५०७५२३४९३), अनंत मेस्त्री (९४०३३६५०७६) किवा गुरूनाथ मेस्त्री (९०४९११८०१२) यांच्याशी संफ साधावा.