You are currently viewing भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टाचा आदर्श, जेष्ठ खेळाडू, पत्रकारांचाही सन्मान

भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टाचा आदर्श, जेष्ठ खेळाडू, पत्रकारांचाही सन्मान

भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टाचा आदर्श, जेष्ठ खेळाडू, पत्रकारांचाही सन्मान

दोडामार्ग

ग्रामीण भागातील खेळाडूना व्यासपीठ देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टा ने यावर्षी स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आदर्शवत कार्यक्रम आयोजित केला. व्यासपिठावर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी दिसले महत्वाचे म्हणजे क्रिकेटकडे मनोरंजक खेळ म्हणून न बघता सांघिकता आणि गाव विकासाची दृष्टी म्हणून बघून युवकांनी गावविकासात सहभागी व्हावे अशा भावना उपस्थितानी व्यक्त करत युवकांकडून समाजाच्या अपेक्षावरही टिप्पणी केली. एकंदरीत क्रिकेटच्या मैदानावर सामाजिक जाणीव दिसून आली.

यावर्षी सदर लीगला १० वर्ष पूर्ण होत असल्याने दोडामार्ग तालुक्याच्या क्रीडा चळवळीत योगदान देणारे जेष्ठ खेळाडू, पत्रकारीता क्षेत्रात योगदान देणारे पत्रकार यातील निवडक व्यक्तींचा समितीच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये तेजस देसाई, शाणी बोर्डेकर,महेंद्र करमळकर, गोविंद शिरसाठ, शाबी तुळसकर, प्रमोद गवस, देविदास बागेलकर यांचा प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला तर स्पर्धेच्या पुढील दोन दिवसात प्रभाकर धुरी, लवू खानोलकर, संतोष देसाई, संदेश रेडकर, राजेश पुलारी, प्रशांत फाटक, संजू गावडे
अमित देसाई, तुळशीदास नाईक यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजक अनिल गवस, हेमंत कर्पे, रत्नकांत कर्पे, प्रशांत आरोलकर, दिनेश कर्पे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे निवेदन अतुल कर्पे यांनी केले. भूतनाथ प्रीमियर लीग कोनाळकट्टाने गेल्या १० वर्षाचा प्रवास अखंडीत ठेवावा अशा शुभेच्छा देत समितीच्या नियोजनाबद्दल उपस्थितानी कौतुक केले.

👉👉 *पहा अधिक बातमी*

*=========================*
*प्लन्बिंग तसेच सॅनिटरी सामान योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण*

🚽🚿🛁 *शांती एंटरप्रायझेस*🚽🚿🛁

♦️ *एम. के. अपार्टमेंट, भेडशी रोड, दोडामार्ग*

📲 *प्रोप्रा. विठोबा पालयेकर, ९४२३३०१७८०, ८०१०२९३२६८*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ताज्या घडामोडी आणि थेट बातम्यासाठी आमचा whatsapp चॅनल आजच जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118

डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज का app आ गया है ।

सभी सदस्य नीचे दिए लिंक पर क्लिक करके तुरंत ही जुड़ें और अपना सदस्य Community कार्ड प्राप्त करे – Powered by Kutumb App

https://kutumbapp.page.link/F5dsb4ELQ269Yu8XA?ref=3C00C

प्रतिक्रिया व्यक्त करा