उपरलकर देवस्थान वाढदिवसानिमित्त अभिषेक व महापूजेचा नागरिकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा – राजू मसुरकर
सावंतवाडी
सावंतवाडी उपरलकर देवस्थान 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपरलकर दैवताच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक व महापूजा असून ह्या अभिषेक व पूजेला सर्व नागरिकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.
*सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुका शहर गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी अभिषेक व महापूजा दरवर्षीप्रमाणे होणार आहे या अभिषेक व महापूजेला सर्व नागरिकांनी तीर्थप्रसाद घेऊन लाभ घेण्यात यावा*
*तसेच रात्री नऊ वाजता दशावतार नाटक होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 365 खेड्याचा अधिपती देवस्थान हे जागृत देवस्थान असून अनेक नागरिक या देवस्थानाच्या चरणी नतमस्तक होत असतात अनेक भाविकांची पूर्व काळापासून या देवस्थानावरती श्रद्धा असून तिथे भाविक नागरिक येत असतात*
तसेच या देवस्थानाकडे भाविक आपली समस्या घेऊन व गावकऱ्यांमार्फत गारायने घालून नवस देत असतात असे हे जागृत देवस्थान सावंतवाडी शहराला लाभले असून सर्व नागरिकांची श्रद्धा या देवस्थानावरती आहे.
कै प्रभाकर रामकृष्ण मसुरकर उभा बाजार सावंतवाडी सोन्या चांदी दागिन्यांची व्यापारी श्री दत्त उपासक यांच्या 1984 च्या काळात पहाटेच्या वेळी साखर झोपेमध्ये स्वप्नात उपरलकर देवस्थान मूर्ती अशा स्वरूपात आली व त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद दिल्याने खडबडून जागे झाले
त्यानंतर त्यांनी ही मूर्ती करण्यासाठी कै. दादा चव्हाण मूर्ती कलाकार यांना सांगून त्यांच्या स्वप्नातली पाच फणा नागाची असलेली उपरलकर दैवताची आलेली मूर्ती बनवून ही मूर्ती ची स्थापना 1984 या काळामध्ये बसवण्यात आले
त्यानंतर काही काळ संपल्यानंतर एक दिवस दुपारच्या वेळी या उपरलकर देवस्थान जवळ आले असताना तिथल्या असलेले गावकरी मंडळींना सांगितले ही मूर्ती ची स्थापना मी करून दिली आहे त्या मूर्तीची पूजाअर्चा आपण कधी करणार तुम्हाला काही पैसे लागतील तर मी द्यायला तयार आहेत
त्यावेळी आपल्या दोन पैशाची पाकीट भरलेले देवस्थानच्या पिढी वरती ठेवून दत्त उपासकाच्या आवेशामध्ये बोलून तिकडनं निघून गेले त्यानंतर असलेले गावकऱ्यांनी आपल्याला एक शुभ संकेत मिळाला हे मानून त्या सालापासून श्री उपरलकर देवस्थानची महापूजा करण्याची ठरवून त्या सालापासून अभिषेक व महापूजा त्या काळापासून सुरू केली आहे*
*अशी माहिती सावंतवाडी शहराचे सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी नागरिकांच्या माहितीसाठी दिली आहे*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोन्या-चांदीचे व्यापारी*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क क्रमांक 9422435760*