जेष्ठ नागरीकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
जेष्ठ नागरीकांना कायदेविषयक तरतुदीची, शासनाच्या विविध योजनांची सायबर सुरक्षितता अशा अनेक विषयांवर जेष्ठ नागरिकांना माहिती देण्यासाठी 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती हॉल, आर.एस.एन हॉटेलच्या पाठीमागे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे. अशा इच्छुक जेष्ठ माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी या मेळाव्यात उपस्थित रहावे. या मेळाव्यात जेष्ठ नागरीकांना कायदेविषयक मार्गदर्शन, आरोग्यविषयक मार्गदर्शन, जेष्ठ नागरीकांकरीता असलेल्या बँकांच्या विविध योजनावर मार्गदर्शन होणार आहे. तसेच माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना निवृत्ती वेतनाबाबत स्पर्श प्रणालीत (SPARSH PORTAL) येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820,9322051284 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.