*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कान्हा*
कान्हा तुझी भक्ती
मिरानेच करावी
तुझे नाव घेता
राधा ही स्मरावी
गोपिकांचा तू लाडला
दही माखनं चोरतो
एका करंगळीत रे माधवा
तू गोवर्धन धरतो
तुझ्या बासरीच्या सुरात
सारे सवंगडी धावत येतात
यशोदा देवकीचा तू रे नंदलाल
तुला किती लळा लावतात
गोविंदा आला रे आला
केशवा तुझा गजर होतो
नटखट कृष्ण कन्हैया रे तू
नंदकिशोर तू दही हंडी फोडतो
संजय धनगव्हाळ
अर्थात कुसुमाई
९५७९११३५४७