You are currently viewing जगणेच असे आहे

जगणेच असे आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वी देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जगणेच असे आहे*

—————————————

आताशा मी माझ्याशीही भांडत नाही

माझे सोडा,कुणालाही दुखवत नाही

 

सूर्यास्ताच्या निस्तेज संध्याप्रकाशात

थकलेले -भागलेले चेहेरे बघवत नाही

 

किती ताण सहन करिते मन बिचारे

वेदना सांगाव्या असे जवळचे नाही

 

आरशात पाहता प्रतिबिंब खंगलेले

उसने अवसान शरीरात उरत नाही

 

भरजरी आसमंत मनाला भुलवितो

निर्धना यातले काही मिळणार नाही

 

लोकांचे काय बाबा,असे मजेत ते

पहाण्या कुणाकडे त्यास वेळ नाही

 

हे रडगाणे आहे ,नका समजू तुम्ही

जगणे ज्यांचे असे, त्यांना गत्यंतर नाही

————————————————-

कविता- जगणेच असे आहे

कवी- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

————————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा