*विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवुन आपल्या गावाचे नाव रोशन करा – प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा – सिंधुदुर्ग*
वेंगुर्ला :
मठ ग्रामपंचायत हद्दीतील शालेय विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल भाजपा च्या वतीने सरपंच सौ. रुपाली नाईक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, भेटवस्तु व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, उपसरपंच संतोष वायंगणकर, माजी सरपंच धोंडी गावडे, बुथप्रमुख अनिल तेंडोलकर, युवा नेते अजित नाईक, ग्रा.पं.सदस्य शमिका मठकर उपस्थित होते.
यावेळी तबला वादन या क्षेत्रात संगीत विशारद ही पदवी मिळविल्याबद्दल कु.वेदांग महेश बोवलेकर, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल कु.रुद्र दिगंबर मोबारकर, जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धा २०२४ – २५ प्रथम क्रमांक तसेच राज्यस्तरीय प्रदर्शनात निवड झालेल्या कु.काशिनाथ संतोष तेंडोलकर, जिल्हास्तरीय हॅकेथाॅन स्पर्धा २०२४ – २५ प्रथम क्रमांक कु. सुयश संतोष नांदोसकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि आपल्या यशात शिक्षकांबरोबर आई – वडीलांचा सुद्धा वाटा आहे. यश मिळविण्यासाठी जिद्द, प्रयत्न व चिकाटी महत्वाची आहे. यश मिळविल्यानंतर हुरळुन न जाता यशात सातत्य ठेवणे आवश्यक आहे . विविध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात महत्वाची भुमीका बजावतात. विद्यार्थ्यांनी त्यात आपली छाप उमटवावी तसेच सुप्त गुणांचा विकास होण्याकरीता विविध स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्याना ज्ञानदान देणारे शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी पालक प्रा.महेश बोवलेकर सर, शिक्षीका अंजली माडये मॅडम, अवनि जाधव मॅडम, संतोष तेंडोलकर, सुशीला नांदोसकर, राजु मोबारकर, दुर्वा मोबारकर, मेहंदि बोवलेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र खानोलकर यांनी केले.