You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या युवराज नाईकची बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

बांदा केंद्र शाळेच्या युवराज नाईकची बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

*बांदा केंद्र शाळेच्या युवराज नाईकची बेंगलोर अभ्यास दौऱ्यासाठी निवड*

*बांदा*

राष्ट्रीय आविष्कार अभियान सन २०२४ – २५ या उपक्रमांतर्गत Exposure Visit Outside State हा अभ्यासदौरा बेंगलोर – म्हैसूर – कर्नाटक येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या आयोजित केला असून या राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील इयत्ता सातवी इयत्तेतील युवराज मिलींद नाईक याची निवड झाली आहे .
जिल्ह्यातील ज्या शाळा सर्वात जास्त प्रगत व ज्या शाळेचे विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती मध्ये सर्वोत्तम आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व बक्षिस देण्यासाठी हा अभ्यासदौरा राज्याबाहेरच्या स्थळांना भेटी देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे . ४ते ९फेब्रुवारी२०२५ या दरम्यान संपन्न होणाऱ्या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळातील एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत . अभ्यास दौऱ्यात विविध शैक्षणिक – अध्यात्मिक – विज्ञान -तंत्रज्ञान व कलात्मक तसेच निसर्गरम्य स्थळांना भेटी आयोजित करण्यात आल्या आहेत.
युवराज मिलींद यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपशिक्षक जे.डी.पाटील व पदवीधर शिक्षक उदय सावळ यांनी युवराजला रोख रक्कम बक्षीस देऊन सन्मानित केले. युवराजला वर्गशिक्षका कृपा कांबळे,रसिका मालवणकर, स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस,जागृती धुरी , मनिषा मोरे, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा