YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट…..
नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी…..
सावंतवाडी
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा यामध्ये समावेश होता. प्रदर्शनात ईव्ही, हायड्रोजन इंजिन, हायब्रीड टेक्नॉलॉजी, सीबीजी आणि फ्लेक्स फ्युएल सिस्टीमची वाहने जवळून पाहता आली. भविष्यात पर्यायी इंधनाकडे होणाऱ्या संक्रमणाची माहिती तज्ञांकडून मिळाली.
विद्यार्थ्यांनी टाटा सीएरा आणि मारुती ब्रिझाच्या इलेक्ट्रिक मॉडेल लॉंचिंगला देखील हजेरी लावली. सोबतच हरियाणातील हेरिटेज ट्रान्सपोर्ट म्युझियमलाही भेट दिली. व्हिंटेज कार्स, मोटर सायकल्स आणि बोटी पाहिल्या. कुतूबमिनारला भेट देत प्राचीन गंजरोधक तंत्रज्ञानाची रचना पाहिली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत प्रा.वरूण महाबळ व प्रा. हेमंत डोंगरे उपस्थित होते. भेटीचे नियोजन प्राचार्य डॉ.रमण बाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा.स्वप्नील राऊळ यांनी केले.