शिवजयंतीनिमित्त कोलगांव येथे वेशभूषा स्पर्धा
कोलगावातील महिलांसाठी ‘कोलगाव सौभाग्यवती ‘ कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी :
कोलगाव येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती उत्सव निमित्ताने १ ते १० वर्षा मधील मुलांची वेशभूषा स्पर्धा व कोलगावातील महिलांसाठी कोलगाव सौभाग्यवती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करणे. तसेच या वेळी माणुसकी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचे सत्कार करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक स्पर्धकांनी तसेच रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कोलगाव ग्रामपंचायत रंगमंच या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती माणुसकी प्रतिष्ठान व कोलगाव ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.