You are currently viewing जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी ई –केवायसी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी ई –केवायसी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांनी ई –केवायसी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या एकूण 6लाख 57 हजार 898 लाभार्थ्यांपैकी अद्यापर्यंत 43 टक्के लाभार्थ्यांचे ई- केवायसी पूर्ण झालेली नाही. ज्या लाभार्थ्यांची अद्यापही ई- केवायसी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांची ई -केवायसी पूर्ण करण्यासाठी रास्तभाव धान्य दुकान स्तरावर विशेष मोहिम अंतर्गत कँम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे. ई -केवायसी न झलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव धान्य दुकानदार यांच्याशी त्वरीत संपर्क साधून दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत ई- केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

             सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे व शिधापत्रिकेसोबत संलग्न करण्यात आलेल आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नमूद केलेली व्यक्ती त्याच आहेत याची खात्री करण्यासाठी ई -केवायसी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याव्दारे आधार क्रमांक संलग्न शिधापत्रिकेमध्ये नमूद योग्य व्यक्ती असल्याची खात्री होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा