You are currently viewing अंगणवाडी सेविकांचा गौरव…

अंगणवाडी सेविकांचा गौरव…

सिंधुदुर्ग :

मुलांची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना घडविताना समाजासाठी केलेल्या सामाजिक कार्यातून केलेले काम आदर्शवत आहे.  हा आदर्श अन्य अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्य सेविका यांनी घ्यावा, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्षा समिधा नाईक यांनी केले. जिल्हा नियोजन सभागृहात जि.प. महिला बाल विकास विभागामार्फत आदर्श अंगणवाडी सेविका मुख्य सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जि .प सदस्या श्वेता कोरगावकर, संपदा देसाई, पल्लवी राऊळ, पल्लवी झीमाळ, प.स. सदस्या सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच प्रीती देसाई ,महिला बाल विकास अधिकारी अमोल पाटील आदींसह पुरस्कार प्राप्त मुख्य सेविका, सुपरवायझर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, तालुका प्रकल्प अधिकारी, महिला बाल विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .

सूत्रसंचालन बाल विकास विभागाच्या संध्या मोरे, विद्या गुरखे यांनी केले. प्रास्ताविक महिला बालविकास अधिकारी अमोल पाटील यांनी केले. महिला बाल विकास विभागामार्फत दरवर्षी देण्यात येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांना पुरस्कार दिले जात आहेत. कोरोना काळातही अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांनी उत्तम काम केले असल्याचे ते म्हणाले, यावेळी एकूण ४९अंगणवाडी सेविका, तीन मुख्य सेविका ४९ मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ ,प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

जि.प.अध्यक्षा समिधा नाईक म्हणाल्या, अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कार्य मोलाचे आहे. लहान वयात विद्यार्थीदशेत तीन वर्षानंतर बालक घडविण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात त्यांना  पोषण आहार आरोग्याची काळजी यासह मुलांची काळजी घेण्याचे काम वाखाणण्याजोगे आहे. तीन वर्षानंतर मुल विद्यार्थिदशेत घडविण्याचे काम करताना समाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या काम करताना जनतेच्या हिताच्या दृष्टीने विविध योजना समाजापर्यंत पोहोचून केलेल्या कार्याचा हा गौरवच आहे. जिल्ह्यातील 109 अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका यांचा आज गौरव केला जात आहे अशा अनेक आदर्शवत अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडीसेविकांचा आदर्श अन्य अंगणवाडी सेविकांनी घेऊन पुढील वर्षी आपला या पुरस्कारासाठी गौरव होईल असे आदर्शवत कार्य करा असे आवाहन नाईक यांनी केले.

यावेळी मुख्य सेविका क्षमा प्रभुदेसाई यांनी आपले विचार व्यक्त करत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका आणि मदतनीस आणि केलेल्या कामाची ही पोचपावती आहे यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यामुळेच आम्ही आज पुरस्कार प्राप्त होऊ शकलो असेही सांगितले.

यावेळी महिला बाल विकास विभागातील सातत्याने कार्यतत्पर विस्तार अधिकारी म्हणून काम करणारे आणि गौरवास पात्र असे पी. आर. सावंत यांचा  जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + thirteen =