You are currently viewing !! कथा एकलव्याची….!!

!! कथा एकलव्याची….!!

*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक कवी श्रीकांत धारकर लिखित पुस्तक परिचय*

 

*!! कथा एकलव्याची….!!*

 

” कथा एकलव्याची” ही ‘कादंबरी नुकतीच वाचण्यात आली एकदा वाचायला बसलो तर काय तीन तास सतत वाचत वाचतच होतो वाचतच होतो खिळवून ठेवणार कथानक आणि लेखनसुद्धा भाषा शैली उत्तमच पुढे काय पुढे काय अस करत करत पुढे पुढे वाचतच जातो उत्सुकता वाढतच जाते अशी उत्सुकता वाढवणारी आणि खिळवुन ठेवणारी एकलव्याच्या अलौकिक आदर्श व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवणारी हदयस्पर्शी व प्रेरणा दायक कादंबरी” कथा एकलव्याची”

लेखक आहेत शंकर कऱ्हाडे

शंकर क ऱ्हाडे यांना संपूर्ण महाराष्ट्र बाल कथाकार म्हणुन ओळखतात मुलांसाठी अनेक बालकथा संग्रह लिहीले आहेत त्या साठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळले आहेत वय वर्ष फक्त ९३ वर्ष शतकाच्या उंबरठयावर असणार हे व्यक्तीमत्व . याही वयात लिहिण्याचा उत्साह वाखाण्या सारखा अर्थात एखादया तरुणालाही लाजवेल असाच त्यांच्या नावावर आज रोजी २७ पुस्तक असुन २ पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत म्हणजे एकुण२९ पुस्तकांचे ते मानकरी आहेत याशिवाय त्यांचे मुलांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम सुद्धा ते सादर करतात अशा या विविध पैलुनी नटलेल्या व्यक्तीमत्वाने ” कथा एकलव्याची” ही कादंबरी लिहून साहित्य विश्वात एक मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

मावळत्या आयुष्यात उमलले ले हे भावपुष्प म्हणुन कांदंबरीची भावनिक सुरवात केली आहे सुरवातीस लेखकाने मनोगत व्यक्त केले आहे.

वास्तविक पाहता एकलव्य म्हटल की आठवतात द्रोणाचार्य दक्षिणा म्हणुन ” अंगठा ” मागणारे एवढच आपल्याला माहिती आहे या व्यतिरिक्त जुजबी अशी माहिती उपलब्ध असेलही पण ती पुर्ण नाही अपुर्ण आहे ही अपुर्णतेची पोकळी भरून काढण्याचे कार्य लेखकानी केले आहे माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत.

यात एकलव्य द्रोणाचार्याना जवळपास तीन वेळ भेट ला आहे आपल शिष्यत्व स्विकाराव अशी प्रार्थना करीत परंतु द्रोणाचार्यानी त्याला नाकारल आणि उलट एकलव्याला स्वयंगुरू आत्मगुरू होऊन निष्ठेन अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

आशीर्वाद दिला तो एकलव्याने मानला सुद्धा द्रोणाचार्यानी गुरु म्हणुन एकलव्याला शिक्षण दिल असत तर काय झाल असत? कदाचीत तो दुसरा अर्जुन झाला असता दुसरा दुर्योधन झाला असता महाभारताच्या युद्धात इतर अठरा अक्षौहिणी सैन्य प्रमाणेच

भीष्म: द्रोण कर्ण या सारख्या महारथी योध्दया सारख च एकलव्याच सुद्धा पतन झाल असत का?

एकलव्याच गुरुपद नाकारण्याच द्रोणाचार्याच्या कृतीच समर्थन करायच का?

गंगापुत्र भीष्म साक्षात सुर्याचे तेज घेऊन जन्माला आलेला कर्ण आणि द्रुपदा सारखा जीवलग मित्राकडून मानहानी झाल्यावर सुड घेण्यासाठी म्हणुन का होइना अर्जुनाला वीर धनुर्धर बनविण्याच्या अट्टहासापायी द्रोणाचायाना एका अर्थान दुर्योधनाची चाकरीच पत्कारावी लागली हीच त्यांची नियतीच होती का?

अवमान . अवहेलना ‘ कुचंबणा सहन करूनही या महायोद्धाना संपूर्ण आयुष्यात क्षणोक्षणी मरणयातनाच भोगाव्या लागल्या किमान त्या तरी एकलव्याच्या प्रारब्धातून टळल्या असे वाटते

एकलव्य हा निषादपुत्र नव्हे तर सुतपुत्र बनलेल्या सुर्यपुत्र कर्णासारखाच वीर योद्धा होता धनुर्धर होता आणि हे ज्ञान त्यान एकनिष्ठेन एकलक्ष्यो मनान प्रयत्न पूर्वक मिळवलेल होत तो श्रीकृष्णाचा अत्यंत जवळचा नातलग होता. तो भिल निषाद नव्हता तर तो क्षत्रिय होता उच्च कुळात त्याचा जन्म झालेला होता एकलव्य हा कृष्णाचे काका देवश्रवा यांचा मुलगा होता थोडक्यात कृष्णाचा चुलत भाऊच होता.

द्रोणाचार्याच्या वधानंतर एकलव्याचा मित्र अश्वत्थामाला भेटायला गेला होता त्या वेळी महाभारतातील युद्ध शेवटाकडे चाललेले होते युद्धाच्या धुमश्चक्रित एखादयाच्या बाणाने एकलव्याचा वेध घेतला असता हे जाणुन श्रीकृष्णा ने स्वतःच सुदर्शन चक्र सोडुन एकलव्याला या जीवन संघर्षातून मुक्ती दिली असा एकलव्याच्या जीवनसंघर्षाच्या शोध या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे

तस बघीतल तर एकलव्यावर फारस कोणी लिहिलं नाही आणि जे काही लिहिले आहे ते फक्त अंगठ्या पुरतच मर्यादित आहे.

या कांदंबरीचा विविध अंगाने लेखन करण्याचा त्यावर पुस्तक लिहिण्याचा भविष्यात अनेक जण प्रयत्न करतील असा दृढ विश्वास लेखकाला आहे.

सदर कादंबरी लिहीतांना ज्या ग्रंथांचा आधार घेण्यात आला त्याचा तपशिल

१)” ठसठसणारी जखम” राजा पटवर्धन यांचा लेख

२) हरिवंश पुराण

३) विष्णु पुराण

४) महाभारत १ २ खंड

५) प्राचीन सिध्देश्वर शास्त्री चरित्र कोश

६) विश्वकोष

७) “एकलव्य” कादंबरी शरद दळवी

८) महाभारताचे वास्तव दर्शन — प्रा अ . दा . आठवले

यां ग्रंथांचा आधार घेऊन कादंबरीची निर्मिती केली आहे.

सदर कादंबरी ही अंशात्मक चरित्र आहे अस मला वाटते.

 

सदर कादंबरी ही छत्रपती संभाजी नगर येथील रजत प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहे.

सदर कादंबरी मुळे अनेक प्रश्नांची उकल या मुळे होइल असे वाटते वाचकाना निश्चित आवडेल असा मला विश्वास आहे एका वेगळ्या विषयावर ची कादंबरी वाचायची उत्सुकता प्रत्येक वाचकाची असते त्यांची उत्सुकता या कादंबरीच्या निमित्याने पुर्ण होणार आहे यात शंकाच नाही प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी ही” कथा एकलव्याची” कादंबरी निश्चित आहे.

 

श्रीकांत धारकर

बुलडाणा

९४२२१८४३३६

 

” कथा एकलव्याची ”

शंकर कऱ्हाडे

९६९९३६८२२१

रजत प्रकाशन

छ संभाजी नगर

९८५०१४००२५

प्रतिक्रिया व्यक्त करा