You are currently viewing डेगवे गावच्या ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव १ फेब्रुवारीला

डेगवे गावच्या ४८ खेड्यांच्या श्री स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव १ फेब्रुवारीला

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील ४८ खेड्यांचा अधिपती असलेल्या डेगवे गावच्या श्री.स्थापेश्वर,महालक्ष्मी देवतांचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी साजरा होणार आहे.
यंदाचा जत्रोत्सव करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासन व ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली व श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी देवस्थान समितीच्या कार्यपध्दती नुसार श्री स्थापेश्वर देवतेला केळी, नारळ, साखर, पेढे ठेवणे. श्री महालक्ष्मीची ओटी भरणे,नवस फेडणे,नवस करणे, देव-देवीचे दर्शन घेणे, रात्री मंदिरा सभोवताली पालखी प्रदिक्षणा काढणे,रात्री .सुधाकर दळवी संचालक, संचलीत ” चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळाचा “त्रिचंडी याग” हा नाट्यप्रयोग सादर करणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकानी ठरविक समांतर अंतर ठेवून व मास्क लावून रागेंत श्री स्थापेश्वर ,महालक्ष्मी देवीचे दर्शन घ्यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर जत्रेच्या दिवशी सकाळी प्रतिवर्षी प्रमाणे”श्री स्थापेश्वर,महालक्ष्मी दिनदर्शिका २०२१” या दिनदर्शिकेचे देणगी मुल्य घेऊन वितरण करण्यात येणार आहे. शिवाय जत्रेच्या दिवशी मंदिरा सभोवती आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा