वैभववाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व्यापारी महासंघाच्या पुरस्काराचे वितरण
जेष्ठ व्यापारी टि.एस. घोणे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
वैभववाडी
वैभववाडी येथे पार पडलेल्या जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वैभववाडी शहरातील ज्येष्ठ व्यापारी टी. एस. घोणे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 37 वा व्यापारी एकता मेळावा संपन्न झाला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांना मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले

यावर्षी ज्येष्ठ व्यापारी टी. एस. तथा घोणेमामा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कै. भाई भोगले स्मृति पहिल्या पिढीचा युवा व्यापारी गौरव पुरस्कार नयन मोरे यांना प्रदान करण्यात आला. कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला व्यापारी गौरव पुरस्कार श्रीमती सरोजिनी भोवड यांना प्रदान करण्यात आला. आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्कार श्रीराम शिरसाट कुडाळ यांना प्रदान करण्यात आला. कै. बापू नाईक स्मृती जिल्हास्तरीय विशेष उपक्रमशील पर्यटन व्यावसायिक पुरस्कार – माचली रिसॉर्टचे संस्थापक भैय्या सामंत यांना प्रदान करण्यात आला. कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार – नांदगाव व्यापारी संघटना नांदगाव यांना देण्यात आला. पुरस्कार प्राप्त सर्व व्यापाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.