रतन टाटांच्या नावाने मला अवॉर्ड मिळणे म्हणजे जीवन सफल.! – दयानंद कुबल.
मुंबई : रतन टाटांनी आपल्या जीवनात लाखो गरजवंतांच्या वाईट काळात मदत केली. परोपकार, आणि समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित करणारा देवमाणूस म्हणून त्यांची ओळख आहे. समाजात अनेक माणसे आपल्या परीने समाजहितासाठी कार्यरत असतात आणि एखादा मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो त्यावेळी त्याला लोक दगड का फोडतोस असे विचारतात? पण फक्त त्याला आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या माणसांना माहीत असते की त्या दगडातून एक उत्तम मूर्ती घडवण्याचे काम आपण करत आहोत. मूर्ती घडायला आणि घडवायला आयुष्य समर्पित करावे लागते. आणि अशाच समाजातील हिऱ्यांना शोधून मीडिया गेली ७ वर्षे अवॉर्ड देत आहे. असाच एक अवलिया सशक्त युवा भारत बनवण्यासाठी कार्यरत आहे.
येणारी नवीन पिढी उत्तम माणूस म्हणून घडवायची असेल तर मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत, त्यांना पाहिजे त्या वस्तू देऊन आपण त्यांना रोबोट घडवण्याचे काम करून कसे चालेल. त्यांच्या विचारात परिवर्तन केले तरच त्यांच्या जीवनात परिवर्तन होईल आणि ते गेली १३ वर्षे करत असलेल्या दयानंद कुबल यांना हा पुरस्कार देताना आनंद होत आहे, असे गौरवोद्गार देशविदेशात हजारो व्यावसायिक घडवणारे रत्नाकर अहिरे यांनी बोलताना काढले
हा कार्यक्रम आज 28 जानेवारी 2025 ला दादर येथे संपन्न झाला. दादर माटुंगा कल्चरल हॉल माटुंगा येथे सकाळी 12 वाजता सर रतन टाटा एक्सलन्स अवॉर्ड 2025 या अवॉर्डनी कोकण संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांना सन्मानित करण्यात आले.
दयानंद श्रीराम कुबल याना हा पुरस्कार त्याच्या सामाजिक एवं शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल देण्यात आला. कोकण संस्थेच्या माध्यमातून दयानंद कुबल यांनी गेल्या १५ वर्षात ग्रामविकास, अनाथ मुले, आदिवासी पाड्यातील मुले, आरोग्याविषयक, स्वच्छ पाणी, स्वच्छता सुविधा, आशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून लाखो लोकांना मदत पोचवली आहे. जागतिक शाश्वत विकासाची उद्दिष्टे पुरी करताना तळागाळातील प्रकल्पना आणि गरजूंचे आयुष्यमान उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे.
कोकण संस्थेला त्यांच्या कार्याबद्दल आज पर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सर रतन टाटांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दयानंद कुबल यांचे सामाजिक स्तरातून कौतुक केले जात आहे.