You are currently viewing युवकांसाठी नववर्षात निःशुल्क गझल लेखनकार्यशाळा

युवकांसाठी नववर्षात निःशुल्क गझल लेखनकार्यशाळा

 

गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत लवकरच महाविद्यालयीन युवकांसाठी विशेष ऑफलाईन/ प्रत्यक्ष नि: शुल्क गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवकांना साहित्याची गोडी लागावी आणि त्यांनी लिहिते होऊन सशक्त आणि सकस लेखन करणारे तरुण गझलकार तयार व्हावेत, या उद्देशाने गझल मंथन साहित्य संस्थेमार्फत ही नि:शुल्क मोहीम राबविण्याचे ठरवले आहे.

सदर गझल लेखन कार्यशाळेमध्ये गझल मंथन साहित्य संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड महाविद्यालयीन युवकांना गझल लेखनासाठी मार्गदर्शन करतील.

अधिक माहितीसाठी महाविद्यालयांनी अवश्य संपर्क साधावा असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्था कोकण विभाग प्रमुख व गझल लेखन कार्यशाळा आयोजन समिती अध्यक्ष डॉ .मनोज वराडे (भ्रमणध्वनी क्रमांक ९८६९३३६३३७) यांनी केले आहे.

 

*शोभा वागळे*

(मुंबई कार्यकर्ती

गझल मंथन संस्था.)

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा