You are currently viewing एलसीबीने केलेल्या कारवाईत ओसरगाव येथे ५३ हजारच्या दारुसह २ लाखाचा मुद्देमाल जप्त..

एलसीबीने केलेल्या कारवाईत ओसरगाव येथे ५३ हजारच्या दारुसह २ लाखाचा मुद्देमाल जप्त..

एलसीबीने केलेल्या कारवाईत ओसरगाव येथे ५३ हजारच्या दारुसह २ लाखाचा मुद्देमाल जप्त..

ओसरगाव बोर्डवे तील दोघांवर गुन्हा..

कणकवली

बांदा ते ओसरगाव दरम्यान रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची तीन चाकी रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने आज जप्त केला. या घटनेत ओसरगाव आणि बोर्डवे येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष नामदेव देवळी ( वय २९, रा. बोर्डवे, भोगारवाडी, ता. कणकवली ) आणि रोहित राजेंद्र राणे ( वय ३२, रा. ओसरगाव गवळवाडी, ता. कणकवली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या आदेशानुसार एलसीबी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामचंद्र शेळके, पीएसआय समीर भोसले, एएसआय सुरेश राठोड, हवालदार प्रमोद काळसेकर यांच्या पथकाने आज दुपारी दीड वाजता ओसरगाव बोर्डवे तिठा येथे ही कारवाई केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा