You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांना SOF ऑलिम्पियाड ‘ सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश :**

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी SOF ऑलिम्पियाड ‘ सामान्य ज्ञान’ विषय परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेतील १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये इयत्ता ३ री मधील कु. अथांश अनंत बांदेकर, कु. वेद हरेश बेळगावकर व कु. प्रार्थना प्रणय नाईक यांनी सुवर्णपदक पटकावले. तर, परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये, इयत्ता १ ली मधील कु. नित्या शंकर धुरी, कु. नुपूर दिनेश वारंग, इयत्ता २ री मधील कु. इशिता रामकृष्ण नाईक, कु. गिरीश विनायक कुडकर, कु. राधेय राजेश मोरजकर, इयत्ता ३ री मधील कु. शिवेन मयुर पेडणेकर, कु. शिवास मयुर पेडणेकर, कु. श्रियांश संजय सावळ, कु. अधिश स्नेहल गोवेकर, कु. अधृत स्नेहल गोवेकर, कु. अन्वय राहुल मांडवकर, कु. वीर दादासाहेब शिंदे , तसेच इयत्ता ६ वी मधील कु. रुद्र महेंद्र धुरी, कु. हर्ष समीर साटेलकर व कु. साईना श्रीराम अळवणी या सर्व विद्यार्थ्यांना वरील परीक्षेत सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच, वरील परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत व सौ. अमृता सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या शिक्षकांनाही प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा