You are currently viewing कुडाळ येथे १० फेब्रुवारीला पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा

कुडाळ येथे १० फेब्रुवारीला पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्सची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलीच शाखा कुडाळ येथे होत आहे. हा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. संपन्न होणार आहे. पीएनजी ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा नीलमताई नारायण राणे यांच्या हस्ते तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे तसेच सारस्वत बँक संचालक सुनील सौदागर, गुरुवर्य चंद्रकांत नाडकर्णी आधी उपस्थित राहणार आहेत. पीएनजी शाखेचे कुडाळ हायस्कूल समोर सारस्वत बँक शेजारी कुडाळ वेंगुर्ला रोड पडतेवाडी येथे भव्य दालन उभारण्यात आले आहे. या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असून या उद्घाटन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ, संजय पिंगुळकर, अजय पिंगुळकर यांनी केले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा