पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने ठाणे येथे आदर्श
शिक्षिका त्रिशला कदम यांचा गौरव
सिंधुदुर्ग
पंचशिल ट्रस्ट ओरोस आदर्शनगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेगवेगळे उपक्रम साजरे होत असतात. मुंबई गोवा हायवे वर वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, देहदानाचे फॉर्म भरणे सामाजिक शैक्षणिक व धार्मिक या कार्यात या ट्रस्टचा खारीचा वाटा असतो. वधु-वर मेळाव्याचे आयोजन करुन बौध्द समाजातील उपवर मुला-मुलींचे जुळुन येती रेशीम गाठी या माध्यमातुन जोडीदाराची सुध्दा निवड केली जाते. असे या एक ना अनेक उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातुन चालु असतात. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी ठाणे येथे बौध्द समाज व धनगर समाज यांच्या कोकणस्थ वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त पंचशिल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संजय खोटलेकर यांच्या मातोश्री दिवंगत शिला बलवंत खोटलेकर (शिक्षिका) यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे कार्य केलेले आहे. तसेच अनेक विद्यार्थी घडविले ते आदर्श नागरीक बनले गेले. याचाच एक भाग म्हणून हा त्यांचा आदर्श समाजासमोर विलोभनीय व प्रशंसनीय असावा यासाठी मा. त्रिशला कदम (कांदळगाव) यांना आदर्श शिक्षिका या नावाचा पुरस्कार आम्ही जाहिर करत आहोत. त्यांचाही गौरव समाजा समोर आदर्श असा आहे हे तेवढच सत्य आहे. त्यांच्या या होणा-या गौरवाबध्दल आम्ही त्यांचे हार्दीक अभिनंदन करत आहोत व आभारही मानत आहोत.