‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा’

‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा’

‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा’

उद्धव ठाकरे यांना भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांकडून टोमणा

मुंबई प्रतिनिधी –

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांवर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेमतेम चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी ठाकरे यांनी काम करावे’, अशी आमची विनंती आहे या खोचक स्वरूपात टीका केली. एकीकडे सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या परिस्थितीवरून राज्यातील विरोधक हे सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. तर दुसरीकडे ‘घरात बसून राहणारे पहिलेच मुख्यमंत्री’ अशी टीका भाजप नेते करीत आहेत. पुण्यात टीव्ही पत्रकाराच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर मनसेने ही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. कुठे आहेत मुख्यमंत्री ? ते कधी बाहेर पडणार आहे ? लोकांना कधी दिलासा देणार आहेत ? असे प्रश्न मनसेनेही उपस्थित केले होते. या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, त्यावेळी विरोधकांना टोला हाणला होता.

‘सध्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे’, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कार्यालयात बसूनच काम करतात. ही सध्या काळाची गरज आहे. त्याच प्रकारे मुख्यमंत्रीही त्यांच्या कार्यालयात बसून सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवूनच आहेत. त्यामुळे बाहेर पडून एका ठिकाणी जाण्यापेक्षा कार्यालयातच राहून दहा ठिकाणांची कामे मार्गी लागत असतील तर ते अधिक सोयीचे आणि फायद्याचे आहे, असेही राऊत म्हणाले. परंतु खासदार राऊत यांनी मोदी व उद्धव ठाकरे यांची केलेली तुलना भाजपाला रुचलेली दिसत नाही. त्यामुळेच भातखळकर यांनी तात्काळ राऊतांना असे उत्तर दिले की, कार्यकारी संपादक हे उद्धवजींची तुलना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. ‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात त्या वेळात तरी काम करा’ असा टोमणा त्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून काढला आहे.

भातखळकर यांनी ‘मुख्यमंत्री घरी बसणारा नको असाच समोर येऊन लढणारा हवा’ असं म्हणत त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करताना चा फोटोही ट्विट केला आहे.

तर दुसर्‍या एका ट्विट मधून भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना हि लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी असे म्हटले की, ‘आदित्यजी आपण उपनगराचे पालकमंत्री आहात, लोक आपल्याला शोधत आहेत. कधीतरी वेळ काढून इथल्या हॉस्पिटलची, आरोग्यव्यवस्थेची पाहणी करा. ठाकरे सरकारच्या काळात लोकांची परिस्थिती किती केविलवाणी झाली आहे ते यावरून लक्षात येईल, अशा कठोर भाषेत भातखळकर यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा