You are currently viewing महिला व्यक्तिमत्त्व विकास नि:शुल्क कार्यशाळा उत्साहात संपन्न

महिला व्यक्तिमत्त्व विकास नि:शुल्क कार्यशाळा उत्साहात संपन्न

*महिला व्यक्तिमत्त्व विकास नि:शुल्क कार्यशाळा उत्साहात संपन्न*

पिंपरी

राष्ट्रीय बालिकादिनाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पिंपरी आणि ब्रह्माकुमारी शिवशक्ती लीडरशिप ॲप्रोच (एस एस एल ए) इंडिया रिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीईंग दी बेस्ट व्हर्जन ऑफ यू’ ही महिला व्यक्तिमत्त्व विकास नि:शुल्क कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. रोटरी कम्युनिटी सेंटर, थरमॅक्स चौक, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत भारत आणि नेपाळ स्तरावरील राजयोग मार्गदर्शिका ब्रह्माकुमारी डॉ. सुनीतादीदी, विभागप्रमुख ब्रह्माकुमारी प्रवीणादीदी, ब्रह्माकुमारी सुलभादीदी, ब्रह्माकुमारी सुधादीदी यांच्या मार्गदर्शनाचा सहभागी महिलांना लाभ मिळाला. वय वर्षे अठरा आणि त्या पुढील सुमारे ८० महिलांनी यासाठी सहभाग घेतला होता. इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्ष शालिनी चोप्रा आणि पदाधिकारी महिलांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. आनंदिता मुखर्जी यांनी प्रास्ताविक केले. स्मिता टिळेकर, मनीषा समर्थ, डॉ. संगीता मळेकर, मोहिनी गोयल, वृंदा आंबेकर, नीलम मेहता, मधुरा प्रधान, बेला आगरवाल यांनी संयोजनात सहकार्य केले. संगीता देशपांडे आणि विनिता अरोरा यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली शाह यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा