*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम देशभक्तीपर गीत*
*तिरंगा आमची शान*
भारतभूची आम्ही लेकरे तिरंगा आमची शान
देव ,देश आणि धर्मासाठी अर्पू आम्ही प्राण..
सुजलाम, सुफलाम देशाला या, नको लागाया दिठ
देशभक्तीचे अखंड गाऊ, आपण सारे गीत
प्रत्येकाच्या मनामनामध्ये या, तिरंग्याला मान
देव ,देश आणि धर्मासाठी अर्पू आम्ही प्राण.
सह्याद्रीच्या कडे कपारी, आजही घुमतो नाद
देशभक्तीला अखंड घाली, तिरंगा हा साद
वाटू एकमेकांना आता, धर्मनिरपेक्षतेचे दान
देव, देश आणि धर्मासाठी, अर्पू आम्ही प्राण..
राहो कुणी ना नारी येथे, आता सख्यांनो अबला
तलवारीच्या पात्यासंगे ,लढून दाखवू सकला
दिसेल त्या नराधमाची, छाटून टाकू मान
देव, देश आणि धर्मासाठी, अर्पू आम्ही प्राण…
*सौ सरिता परसोडकर पुसद✍🏻*