*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आमुचा भारत*
हा माझा भारत
आमुचाच देश
प्रांत भिन्न जरी
एकच आवेश…
उंच उंच कडे
ती हिमशिखरे
नद्याही गातात
खळाळती झरे…
दूर वाळवंट
हिम कुठे ऊन
विषम ती हवा
जगती सोसून…
हीच भूमी आहे
खनिजांची खाण
वृक्ष पाणी हवा
निसर्गाचं दान…
खड्या पहा-याने
देशाचे रक्षण
जागती सैनिक
दक्ष क्षणक्षण….
वेगवेगळाले
प्रांत वेश भाषा
एकसंध देश
ह्रदयी मनीषा…
अखंड भारत
लहरो तिरंगा
एकत्वाची वाहे
निर्मळ ती गंगा…..!!
✨✨✨✨✨✨✨
अरुणा दुद्दलवार