You are currently viewing शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री नितेश राणेंना शुभेच्छा

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री नितेश राणेंना शुभेच्छा

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री नितेश राणेंना शुभेच्छा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हयाचे नवनिर्वाचित पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेत सावंतवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचे काम ना. नितेश राणे निश्चितच करतील, असा विश्वास यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्याहस्ते शिवसेना पक्षाच्यावतीने स्वागत केले. तसेच तेरेखोल नदीतील गाळ काढण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा केमीस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीनेही विनायक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपाध्यक्ष विनायक दळवी, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, मळगांव शिवसेना उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, नेतर्डे शाखाप्रमुख जगदेव गवस, सुरेश गवस व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा