You are currently viewing बांद्यात २६ जानेवारीला “अटल रंगभरण स्पर्धा”…

बांद्यात २६ जानेवारीला “अटल रंगभरण स्पर्धा”…

बांद्यात २६ जानेवारीला “अटल रंगभरण स्पर्धा”…

बांदा

भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने ‘अटल रंगभरण स्पर्धेचे’ आयोजन रविवार दि. २६ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यान, मच्छी मार्किट मैदान येथे करण्यात आले आहे.

इयत्ता १ ली ते ४ थी व इयत्ता ५ वी ते ८ वी या दोन गटात रंगभरण स्पर्धा होणार आहे. इयत्ता ९ वी पासून पुढे खुला गटाची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत बालवाडीतील मुलांना रंग भरण करता येणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेसाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी सोबत घेऊन यायचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा