कालव्यालगतच्या शेती- बागायतीचे मोठे नुकसान; ६ महिन्यापूर्वीच केले होते कालव्याचे काम
दोडामार्ग:
तिलारीच्या डाव्या कालव्याला पुन्हा एकदा साटेली- भेडशी भोमवाडी येथे गेल्याच वर्षी काम केले होते त्याच ठिकाणी शुक्रवारी पहाटेच मोठे भगदाड पडले. भगदाड पडलेल्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असुन साटेली- भेडशी -भोमवाडी -कुडासे रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून कालव्यालगतच्या शेती- बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे.सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम करण्यात आले आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठे भगदाड पडले आहे.