*भाजपा , सिंधुदुर्ग आयोजित ‘संविधान गौरव अभियान’ अंतर्गत वेंगुर्लेत वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा ची अमृता नवार प्रथम*
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग द्वारा आयोजित संविधान गौरव अभियान अंतर्गत वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा च्या अमृता नवार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुल्याचे तालुकाध्यक्ष तथा माजी मुख्याध्यापक शामराव काळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष व संविधान गौरव अभियान जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , वेंगुर्ला हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सर, परीक्षक प्रा. बाबुराव खवणेकर सर , प्रा.डॉ.पी.आर.गावडे सर , पत्रकार दाजी नाईक, प्रा.वैभव खानोलकर, प्रा.डॉ.सचिन परुळकर , सर्पमित्र महेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शामराव काळे सर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करीत, संविधान जाणीव जागृती कार्यक्रम आपण आयोजित केल्याबद्दल आपण विद्यार्थी वर्गामध्ये असा विषय घेऊन जाणीव-जागृती करत आहात त्याबद्दल कौतुक केले. तसेच मुलांमध्ये संविधानाबाबत जागृती होणे अत्यावश्यक असल्याचे सांगून भाजपाने घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .
या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:
प्रथम – अमृता नवार, न्यु.इंग्लिश स्कूल, उभादांडा
द्वितीय – आव्हाड प्रणाली राजेश, बावडेकर हायस्कूल , शिरोडा .
तृतीय – सारंग निधी निवृत्ती , बावडेकर हायस्कूल , शिरोडा .
उत्तेजनार्थ प्रथम – गवसकर दिप्ती तिमाजी , सरस्वती विद्यामंदिर – टाक .
उत्तेजनार्थ द्वितीय – शुक्ला चाहत महेश, वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला .
या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषक आणि सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले आणि त्यांच्या भविष्यातील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सदर स्पर्धेचे परीक्षण खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पी. आर. गावडे आणि प्रा.बाबुराव खवणेकर यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ.सचिन परुळकर, प्रास्ताविक प्रा.वैभव खानोलकर आणि आभार प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई यांनी मानले.