You are currently viewing कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख

*कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा- इर्शाद शेख*

सिंधुदुर्ग

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भातील विविध मागण्यांसाठी २६ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा सक्रिय जाहीर पाठिंबा असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.
सावंतवाडी रोड स्थानकावर प्रस्तावित टर्मिनस चे भूमिपूजन दिनांक २७/०६/२०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री श्री दिपक केसरकर व रेल्वे अधिकाऱ्यांचा उपस्थितीत पार पडले होते. तसेच या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले होते.
परंतु आता ९ वर्षे पूर्ण होऊन देखील कोकण रेल्वे महामंडळ सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनस चे काम करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. येथील प्रशासन प्रस्तावित टर्मिनसच्या कामावर आणि येथील प्रवासी सुविधांवर गंभीर नाहीत हेच यावरून निदर्शनास येते.
उपरोक्त विषयानुसार, खालील मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी कोण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी व जनतेची आहे.

१.रखडलेले रेल्वे टर्मिनस चे काम जलद गतीने करण्यात यावे.

२.सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करण्यात यावा.
३.सावंतवाडी स्थानकाचे नामकरण तत्काळ करण्यात यावे.
४.सावंतवाडी स्थानकात खालील रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा.
१२१३३/३४ मुंबई – मंगलोर – मुबई एक्स्प्रेस.
२२२२९/३० मुंबई – मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस.
२२६५५/५६ एर्नाकुलम – निजामुद्दीन – एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेस.
२२६५३/५४ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम साप्ताहिक एक्स्प्रेस.
१२६१८/१७ निजामुद्दीन – तिरुअनंतपुरम – निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस.
१२४४९/५० चंदिगढ – मडगाव – चंदिगढ गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस.
५.कोरोना काळात सावंतवाडी स्थानकातून ZBTT नुसार काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे.
१. १२४३१/३२ निजामुद्दीन – तिरुअनंतपुरम – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस.
२. १२२०१/०२ मुंबई – कोचुवेली – मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस.
६.सावंतवाडी ते बेळगाव ह्या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू करणे.
७.सावंतवाडी स्थानकावरून कल्याण – पुणे मार्गावर नवीन ट्रेन चालू करणे.
उपरोक्त विषयाप्रमाणे मागण्या मान्य कराव्या म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, २६ जानेवारी २०२४ रोजी सावंतवाडी स्थानकावर हजारो लोकांचा उपस्थितीत लाक्षणिक उपोषण आंदोलन केले होते.त्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ रोजी घंटानाद आंदोलन केले होते. वेळोवेळी फक्त आश्वासने दिली गेली परंतू ठोस कृती अजून पर्यंत झाली नाही म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी पून्हा एकदा या सर्व मागण्या मान्य होण्यासाठी व नको असलेल्या गोष्टीना विरोध करण्यासाठी २६ जानेवारी२०२५ रोजी आंदोलन करणार आहे त्याला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा आहे असे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण होण्यासाठी तेथे टर्मिनस बिल्डिंग, नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म, नवीन लाईन, गाड्या धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आदी सोयींची अत्यंत गरज आहे. परंतु आता तेथे वूडन हॉटेल चा घाट घातला जात आहे. यामुळे सावंतवाडी टर्मिनस सरकारला करायचे आहे की नाही अशी शंका येते. सावंतवाडी टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि टर्मिनस ची सुसज्ज बिल्डिंग व्हावी अशी मागणी आहे. तरी या आंदोलना पूर्वीच सरकारने व रेल्वे प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन या मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती करावी व जनतेला आंदोलन करण्यास भाग पाडू नये अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे. अन्यथा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्ष या आंदोलनात भाग घेईल असा इशारा इर्शाद शेख यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा