You are currently viewing इन्सुली प्रशालेच्या शिक्षिका सौ.विशाखा पालव यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश..

इन्सुली प्रशालेच्या शिक्षिका सौ.विशाखा पालव यांचे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश..

सावंतवाडी :

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेच्या सहाय्यक शिक्षक सौ.विशाखा विश्राम पालव यांनी महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ आयोजित मराठी विषय शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत ‘मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातून मला भावलेली महाराष्ट्र संस्कृती ‘ या विषयावर निबंध लिहून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.त्याबद्दल मोहनाबाई कन्याशाळा दिग्रस ,जि.यवतमाळ येथे झालेल्या ४२साव्या राज्यस्तरीय मराठी कृतीसत्रास मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

 

त्यांच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळ इन्सुली संस्था पदाधिकारी, सदस्य,सल्लागार, शिक्षक पालक संघ पदाधिकारी, सदस्य तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले

.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा