You are currently viewing मी न राहिलो कुणाचा

मी न राहिलो कुणाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मी न राहिलो कुणाचा*

 

होते माझे सगळे

मी ही होतो सगळ्यांचा

 

एकमेकांवर प्रेम होते

जीवास जीव देत होते

 

प्रेमळ वागणे होते

प्रेमाने रहात होते

 

ते गाव ते गावकरी

ते नातलग सारेच वारकरी

 

ते रंक आणि ते राव

गुण्यागोविंदाने राहे सारा गाव

 

एका विश्वासाला तडा गेला

तसा गाव राव विखुरला

 

हळूहळू ते न राहिले माझे

अन् मी न राहिलो कुणाचा

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा