You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा एमआयडीसी रेस्ट हाऊस, कुडाळ येथे होणार

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा एमआयडीसी रेस्ट हाऊस, कुडाळ येथे होणार

कुडाळ :

 

जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध समस्यांबाबत चर्चेच्या अनुषंगाने शनिवार दि.6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता एमआयडीसी रेस्ट हाऊस, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यावेळी खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व निर्णय घेतला जाणार आहे.

1) मागील सभेचा वृत्तान्त वाचून कायम करणे.

2) सर्व तालुका संघटना कार्यकारिणी समितीस मान्यता देणे.

3) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिडीत वीज ग्राहकांच्या समस्या आणि अडचणी याबाबतचा उपविभाग निहाय तपशीलवार आढावा घेणे.

4) सर्व 10 उपविभाग निहाय वीज ग्राहक मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेणे.

5) अकार्यक्षम, मुजोरगिरी करणाऱ्या वीज अधिकाऱ्यांच्या बाबतीत ऊर्जा मंत्री, CMD, CE यांच्याकडे तक्रार दाखल करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेणे.

6) जिल्हा संघटनेत आवश्यक ते बदल करणे.

या बैठकीसाठी सर्व जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष, सचिव व समन्वयक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 2 =