सावंतवाडी :
मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ १४ वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.श्री.पंचम खेमराज महाविदयालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील पहीली ते आठवीतील मुला-मुलींनी सहभाग घेतला.राष्ट्रीय संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभासाठी सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर मांजरेकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री.किरण सावंत, अंगणवाडी शिक्षीका सौ.पूर्वा सावंत, आदि मान्यवर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, उपाध्यक्षा सौ.स्नेहा पेडणेकर उपस्थित होते.श्री.ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन करताना मुक्ताई ॲकेडमी मुलांसाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
मुलांच्या व मुलींच्या पाच गटात रोख रक्कम, चषक-मेडल आणि प्रशस्तीपत्र अशी एकवीस पारितोषिके देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
*आठ वर्षाखालील मुलगे* – प्रथम विघ्नेश अंबापूरकर सावंतवाडी, द्वितीय अन्वय सापळे वेंगुर्ला, तृतीय पूर्वांक कोचरेकर सावंतवाडी
*दहा वर्षाखालील मुली* – प्रथम ग्रीष्मा आडेलकर कणकवली, द्वितीय आराध्या देसाई दोडामार्ग, तृतीय अवनी मालपेकर कणकवली
*अकरा वर्षाखालील मुलगे* – प्रथम यश सावंत सावंतवाडी, द्वितीय समर्थ गावडे मालवण, तृतीय श्रेयन गावकर कणकवली, चौथा बृंधव कोटला सावंतवाडी, पाचवा साहीर खांबे कणकवली
*चौदा वर्षाखालील मुली* – प्रथम तनिष्का आडेलकर कणकवली, द्वितीय साक्षी रामदुरकर सावंतवाडी, तृतीय गार्गी सावंत सावंतवाडी, चौथी निर्जरा हुंबे कणकवली, पाचवी अनन्या पारकर मालवण
*चौदा वर्षाखालील मुलगे* – प्रथम पार्थ वझे कुडाळ, द्वितीय यथार्थ डांगी सावंतवाडी, तृतीय विभव राऊळ सावंतवाडी, चौथा पार्थ गावकर सावंतवाडी, पाचवा प्रियांशु जानकर वेंगुर्ला