श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ फोंडाघाट च्या वतीने सत्यनारायण पूजा व राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा
फाेंडाघाट
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मित्रमंडळ बीजलीनगर फोंडाघाट च्या वतीने सत्यनारायण महापूजा आणि भव्य राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ग्रुप डान्स स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई रायगड रत्नागिरी पुणे सह लगतच्या गोवा राज्यातील डान्स ग्रुप संघ सहभागी झाले आहेत.
सकाळी 10 वा.श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद, सायं. ४वा. हळदी-कुंकू समारंभ,सायं. ६वा. बिजलीनगर-फोंडाघाट मधील ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार सोहळा, रात्रौ ७ वा.सुस्वर भजन, रात्री ८.३० वा. कणकवली तालुक्यामधील कलाकारांचा सत्कार सोहळा,रात्री ९ वा. भव्य ग्रुपडान्स स्पर्धा हाेणार आहेत.
श्री सत्यनारायण महापूजा व राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचा तसेच विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक, संयोजक, श्री छत्रपती शिवाजी महाराज तरूण मित्र मंडळ फोंडाघाट-बिजलीनगर च्यावतीने करण्यात आले आहे.