You are currently viewing मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्या अभावी बंद, हे शासनाचे मोठे अपयश – बाबूराव धुरी

मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्या अभावी बंद, हे शासनाचे मोठे अपयश – बाबूराव धुरी

मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्या अभावी बंद, हे शासनाचे मोठे अपयश – बाबूराव धुरी*

दोडामार्ग

मराठी भाषेच्या शिक्षणाकडे सध्या खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, इंग्रजी भाषेचे शिक्षण सामान्य कुटुंबातील लोक घेऊ शकत नाहीत, तरीही शासन त्याकडे जास्त लक्ष देते मराठी माध्यम यामुळे बंद होत चालले आहे, मराठी माध्यमांच्या शाळा ह्या सुद्धा पटसंख्या अभावी बंद कराव्या लागत आहेत हे शासनाचे मोठे अपयश असून आपली वोट बँक तयार करण्यासाठी मराठी मुला मुलींना अशिक्षित ठेवण्याचं काम सध्याची मोठी नेतेमंडळी करत असल्याचा आरोप करत बाबुराव धुरी यांनी मराठीतूनही मोठे माणूस होऊ शकतात यासाठी स्वतःच्या बंधूचा दाखला देत मराठीतून शिक्षणाची सुरुवात करून ते बी. टेक. पर्यंत शिक्षण पूर्ण करून तो मोठ्या पदावर आहेत त्यामुळे मराठी शाळा आणि मराठी माध्यम हे टिकले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश पाटणकर यांनी मराठी भाषा टिकावी यासाठी शासनाला आव्हान केले होते तोच दुवा पकडून मराठी माध्यम टिकण्यासाठी शासन तसेच शासनाचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यायलाच पाहिजे, मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्र टिकेल व महाराष्ट्राचा विकास होईल अशी रोखठोक भूमिका बाबुराव धुरी यांनी कळणे येथील नूतन विद्यालयाच्या पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमात मांडली.

राजकारण हे सध्या बदनाम आहे, मात्र याच राजकारणातून समाजकारण सुद्धा होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यावे व आपली प्रतिमा स्वच्छ ठेवून राजकारणाबरोबरच समाजकारण करावे यातूनच समाजाचे हित आणि समाजाचा विकास होऊ शकतो असेही याप्रसंगी बाबुराव धुरी म्हणाले, नूतन विद्यालय कळणे चा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव धुरी बोलत होते व्यासपीठावर माजी माहिती अधिकारी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सतीश पाटणकर तसेच कळणे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव गणपत देसाई आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे सचिव गणपत देसाई यांनी सुद्धा शिक्षणाविषयी आग्रही भूमिका मांडताना मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी आपण विशेष प्रयत्न करू तर कोकणात अनेक रोजगाराच्या संधी आहे त्याचा अभ्यास बाहेरची लोकं करतात तो आता आपण केला पाहिजे असे सांगत युवकांनी रोजगारासाठी उद्योग धंद्यात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा