सिंधुदुर्गात २८ जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत…

सिंधुदुर्गात २८ जानेवारीला सरपंच आरक्षण सोडत…

ओरोस

जिल्ह्यातील तालुक्यांसाठी सरपंच पदासाठी आरक्षण कोटा निश्चित करण्यात आला असून सदर सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वा. सर्व तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम राबवितांना सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुनर्वसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्य विषयी सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता याबाबी विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत शासन स्तरावरून कळविण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी यानी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा