*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य रचना*
*गजरा*
गजरा
शुभ्र नाजूक
मनाला पडते भुरळ
सुगंध हेरतो रसिक अचूक..
गजरा
मोगरा जाईजुई
हिरवा मरवा त्यात
सर्वांचं लक्ष आकर्षून घेई….
गजरा
तलम पाकळ्या
भरगच्च अबोली पांढरा
कुंतलांवर रुळतो दाट काळ्या…
. गजरा
तसाच सुकतो
वाट बघत सख्याची
पापणीच्या कडा भिजवून जातो..
गजरा
कसा माळू
तो तिथे दूरवर
प्राण लागतात इथे तळमळू..
गजरा
टोपलीतला संपतो
मिटलेल्या डोळ्यांपुढे स्मृतीत
टेबलवर तसाच निपचित पडतो..
गजरा
भावभावनांच्या खुणा
मनात संमिश्र विचार
अंतरीचा आनंद कधी वेदना…!!
🍃🍂🪻🪻🪻🍂🍃
अरुणा दुद्दलवार @✍️
दिग्रस यवतमाळ