बांदा नाबर प्रशालेत स्वाधीन यात्रा उपक्रमाचे बांदा उपसरपंच राजाराम धारगळकराच्या हस्ते उद्घाटन…
बांदा
येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत लॅड ए – हॅन्ड पुणे तर्फे आयोजित स्वाधीन यात्रा या उपक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित बांदा उपसरपंच राजाराम धारगळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक नारायण पित्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर, सहाय्यक शिक्षका रसिका वाटवे, स्नेहा नाईक, कल्पना परब, आदि मान्यवर उपस्थित होते.
शाळेमध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव या यात्रेतून मिळावा या उद्देशाने ही स्वाधीन यात्रा शाळेत घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची तयार करुन विक्री केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शेव पुरी, पाणी पुरी, दाभेली, बटाटावडा, कटलेट, भेळ, लिंबू सरबत, बटाटाभजी असे विविध पदार्थ बनवले. यासाठी शाळेतील शिक्षिका रिया देसाई, गायत्री देसाई, प्रिती पेडणेकर, राकेश परब, भूषण सावंत तसेच सेजल सावंत, प्रकाश झांट्ये यांचे सहकार्य लाभले.