*साहित्यिक अरुण वि. देशपांडे यांना सर्वद जीवनगौरव पुरस्कार-२०२५ प्रदान*
———————————–
मुंबई: विक्रोळी (पु) –
मुंबई येथे शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी सर्वद फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. प्रसिद्ध समाजसेविका, साहित्यिका आणि सर्वद फाउंडेशनच्या संचालक डॉ.सुचिता पाटील व टीम सर्वद फाउंडेशन आयोजित “सर्वद फाउंडेशन स्टार पुरस्कार-२०२५ सोहोळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून श्री.देवेंद्र खन्ना, तर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री पूनम चांदोरकर व डॉ.प्रशंसा राऊत-दळवी, हे मान्यवर उपस्थित होते.
प्रसिद्ध मालिका अभिनेत्री पूनम चांदोरकर यांचे हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण वि. देशपांडे यांना “सर्वद जीवनगौरव पुरस्कार-२०२५” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी २ ते ३ मिनिटांचा माहितीपट (documentry) बनवून पुरस्कारप्राप्त व्यक्तींची माहिती मोठ्या स्क्रीनवर दाखवून मग त्यांना पुरस्कार देणे, ही संकल्पना सुखद वाटली.
यामुळे आपण व्यासपीठावर सेलिब्रिटिच्या सोबत असण्याचा आनंद सर्वांना अनुभवता आला. पुरस्कार घेताना पुरस्कारार्थीनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसहित पुरस्कार स्वीकारणे खूपच भावनिक क्षण होते. या सोहळ्याचे नियोजन अतिशय नेटकेपणाने केले होते याकरिता डॉ.सुचिता पाटील, ओंकार देशमुख, सौ.रुपाली राऊत आणि सर्वदच्या सर्व सदस्यांचे श्री.अरुण वि.देशपांडे-पुणे यांनी आभार मानले तसेच सर्वद फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

