*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*
*‘थोड मनातल’*
******************
*माणसाचा एक स्थायीसभाव असतो की आपल्याकडे जे काही आहे ते खूप आहे याचा विचार न करता दुसऱ्याकडे काय आहे याचा जास्त विचार करतो. आपल्याकडे जर मोटर सायकल असेल तर त्यावर आपण खूश नसतो.पण आपल्या शेजाच्याकडे अचानक बी एम डब्लू कशी आली,कुठून आली एव्हढी महाग गाडी घेण्यासाठी याने काय केले हे जाणून घेण्यासाठी* *स्वतःचा वेळ खर्च करून ईकडन तिकडन शोध लावतो. आणि ऊगाच याला त्याला काहीबाही सांगण्यात धन्यता मानतो. त्यांच्याकडे एका रात्रीत एव्हढी महाग गाडी त्याने कशी काय आणली कुठून आणली त्यांच्याशी आपल्याला काय देणं घेणं ज्याचं त्याचं देवधरम त्यांच्या कडे पण कायं असतं संबंधित व्यक्तीने काय केलं कसं केलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एव्हढी उत्सुकता असते की त्यासाठी आपण आपल्या ध्येयापासून भरकडतो आणि चुकीच्या वळणावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो.आता हा जीवघेणा प्रयत्न करण्यात आपण आपल्या नशिबाला,कष्टांना दोष देऊन मुळ उद्देश विसरून जातो आणि आपल्याला काय करायचं आहे या विचारांपासून दुरावतो. खरतर दुसऱ्याच्या वैभवाला पाहून आपण स्वतःला जाळत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे जसं आहे.त्यात आपण किती सुखात आहोत हे जास्त महत्वाचे. कारण समाधान हि सर्वात मोठी ताकद असते.चेहऱ्यावरचं समाधान माणसाला जगण्याचं बळ देते.बी एम डब्लू जे काम करते तेच काम मोटरसायकल ही करते फक्त* *बघणाऱ्यांचा दृष्टीकोन वेगळा असतो.माणसं कशी देखाव्याला जास्त भुलतात.पण आपलं कष्ट जे असतं ना त्याचं मोल अनमोल असते आपलं कष्ट हिच आपली श्रीमंती आणि कष्टातून मिळालेली श्रीमंत हि चिरकाल टिकणारी असते. चारचाकी गाडीत बसण्याचा आनंद तर मिळतोच पण शेवटी पाय जमीनीवरच ठेवावे लागतात.म्हणून आपले पाय आधीच जमीनीवर असतील ना तर आपण प्रतिकूल परिस्थितीत खूप आनंदात असतो तेव्हा माणसाने आपल्या परिस्थितीच वाईट वाटून न घेता आपली परिस्थिती आपल्याला सुखात ठेवतेय हेच तर खरे जीवन समजायचे.कष्टातून श्रीमंत होणाऱ्या माणसाला कोणीच बरंवाईट बोलतं नाही.उलट त्याचा आदर्श घेतात.काय असतं की श्रीमंतांच्या घरात लाईट असतो तर गरीबांच्या घरात दिवा असतो लाईटाच्या उजेडात उठून दिसणाऱ्या माणसांपेक्षा दिव्याच्या प्रकाशात उजळून दिसणारा माणूस हा नेहमीच सर्वश्रेष्ठच असतो काय*.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७

