You are currently viewing वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात जिल्हा स्काऊट्स व गाईड्स मेळाव्याचे आयोजन

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालयात जिल्हा स्काऊट्स व गाईड्स मेळाव्याचे आयोजन

कणकवली :

सिंधुदुर्ग भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था आणि शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जि.प.सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे,ता. कणकवली जि.सिंधुदुर्ग येथे सोमवार दि. २० जानेवारी २०२५ ते बुधवार दि. २२ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे.

या जिल्हा मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा.नामदार नितेश राणे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार मा.श्री.नारायण राणे हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अनिल पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य का.अ.मकरंद देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व लेखा अधिकारी राजश्री पाटील, उपविभागीय अधिकारी कणकवली जगदीश कातकर, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे मुख्य का.अ.श्रीकृष्ण खटावकर, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे शाळा समिती चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा स.सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती असणार आहे.

तीन दिवस होणार्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर खास आकर्षण म्हणजे पहिल्या व दुसर्या दिवशी सायंकाळी शेकोटी कार्यक्रम, विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी शोभायात्रा आणि तिसऱ्या दिवशी समारोप व पारितोषिक वितरण सोहळा हा विधानसभा सदस्य आमदार दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या मेळाव्यास आजी व माजी विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ स्काऊट- गाईड प्रेमी, यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढवण्याचे आवाहन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा