You are currently viewing घोडेमुखची कोंब्याची जत्रा उत्साहात

घोडेमुखची कोंब्याची जत्रा उत्साहात

अंदाजे पाच हजार कोंबड्यांचा बळी

वेंगुर्ला
कोंकणासह गोव्यात कोंब्याची जत्रा म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या वेंगुर्ला सावंतवाडी तालुका सिमेवरील पेंडुरच्या घोडेमुख ची जत्रा आज साधेपणाने साजरी होत आहे.
कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटीने साधेपणाने उत्सव साजरा करताना भाविकांना आपापल्या घरच्या तुळशीसमोर कोंबडा कापण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भाविकांची गर्दी कमी होती.

काही भाविकांनी कोंबडे कापण्यासाठी आणले होते. वेंगुर्ला पोलीसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी ५च्या आसपास कोंबडे कापण्यात आले. आवाहन केल्यानंतर आज अंदाजे ५ हजारच्या आसपास कोंबड्यांचे रक्त अर्पित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 2 =